"पूर्वची टेस्ट सिरीज
10 ऑगस्ट पासून "
नमस्कार,
पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची बाजू जितकी मजबूत लागते तितकीच ही पेपर साईड देखील मजबूत लागते.
मागील काही वर्षात रयतेच्या टेस्ट सिरीज ने आपणा सर्वांना पेपर साइड मध्ये भरपूर मदत केलेली आहे असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच.
पेपरचा दर्जा, त्यातुन थेट रिफ्लेक्ट होणारे प्रश्न, तुमच्या अभ्यासाची तसेच मानसिकतेची होणारी कडवट परीक्षा आणि त्यामुळे आयोगाचा सोपा होणारा पेपर ही रयतच्या पेपरची आजपर्यंतची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत..
गट ब पूर्व परीक्षेचा कटऑफने ६० चा आकडा ओलांडला आहे आणि अशावेळी रयतच्या सर्व फॅकल्टी चा आणि रयतच्या कंटेंट टीमचा अनुभव आपल्या सोबत असेल आणि तो आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत घेऊन जायला मदत करेल याची खात्री आहे.
Affordable education हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या रयतने नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना कमीत कमी फी मधे ही टेस्ट सिरीज उपलब्ध व्हावी म्हणून शुल्कामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतेलेला आहे.
ऑफलाइन टेस्ट सिरीज या ही वेळेला शाळेमध्येच होणार आहे, पेपरही Bilingual असेल, A,B,C,D असा चार सेटमध्ये असेल आणि दर्जा देखील नेहमीप्रमाणेच असेल.
ऑफलाईन प्रवेश: रयत प्रबोधिनी च्या ऑफिस मध्ये १ ऑगस्ट पासून सुरू होतील.
ऑनलाईन प्रवेश: rayat prabodhini official या ऍप वर कोर्स खरेदी करून घेता येईल.
खाली या टेस्ट सिरीजचे संपूर्ण वेळापत्रक जोडत आहोत.
आपलीच,
रयत प्रबोधिनी ❤️